Monday, 25 July 2011

आई



कोण आहे ती जिच्या मायेत मी गुंतली ,
कोण आहे ती जिच्या पदरात मी सुखावली ...
मला आहे तिचाच आधार ,
तिला मात्र फक्त दुःखाचे दार...
स्वतःच लपवून दुःख , दिलं मला सुख ..
स्वतःच लपवून रडणं , शिकवलं  मला हसणं ..
कडेवर घेऊन लहानपणी, जग हे दाखवलं,
नाजूक हात पकडून चालायला शिकवलं...
सहवासात जिच्या, माझे पहिले पाउल पडले ,
आले भरभर अश्रू , वेड्या त्या मातृच्या मने ...
जेवढी माया केली तेवढीच शिक्षा दिली ,
काय म्हणावे त्या मातृला जी त्यानंतर रडली ...
खूप माया देऊन, स्वतःची ममता वाढवली ,
खूप दुःख झेलून, स्वतःचे सुख विसरली ...
आई शिवाय पूर्ण होत नाही चीमुखल्या जीवांचे जीवन 
त्या जीवांना नेहमीच लागते आपल्या आईचे सुखद मन .
आई ग आई, काय म्हणावे तुला !
मातृत्वच्या पायात अर्पण केले स्वतःला !
एका वाढवून आता मुलीला ,
दिलस तू अर्थपूर्ण जीवन तिला !!!

2 comments: