Monday, 19 September 2011

तुझ्याविना!!

तुझ्याविना आयुष्यात जगणं शिकलच नव्हतं
तुझ्याविना हसणं जमलंच नव्हतं...

मैत्रीच्या या गर्दीत, तुला शोधणं सहज नव्हतं 
वाट चुकले खुपदा पण रस्त्यावर चालणं जमलंच नव्हतं..
तू साथ दिलीस अन वाट सोडणं अवघड होता 
मैत्रीच्या या गर्दीत, तुला शोधणं सहज नव्हतं..

कोणाशी इतकं मन रमलं नव्हतं 
किती वाईट दवस आले, सहज हसणं झालं नव्हतं
किती निर्मल ते शब्द, कधी मनाला सुख देईल वाटलं नव्हतं 
दुखात हसू आलं होतं..

शब्धांना मोल नाही भावनांना आहे, नुकतच कळून आलं होतं
तुझ्या मैत्रीतून बाहेर पडणं कधी अनुभवलं नव्हतं.. 
तुझे शब्द जपून चालणं मानाने ठरवलं होतं
भावनांचा खेळ आहे नुकतचं कळून आलं होतं...

तुझ्याविना आयुष्यात जगणं शिकलच नव्हतं
तुझ्याविना हसणं जमलंच नव्हतं.....!!